प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन, रॅलीत चक्कर येऊन पडल्याने गेले होते कोमात

Tarak Ratna Passes Away | पुष्पा फेम अर्जुनसह अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

tarak ratna

Tarak Ratna Passes Away | बंगळुरू – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता तारक रत्न यांचं निधन झालं असल्याची दुखदायक बातमी समोर येत आहे. शनिवारी रात्री त्यांनी बंगळूरूच्या खासगी रुग्णलायात अखेरचा श्वास घेतला.

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर यांचा चुलत भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेता तारकरत्न एका रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत टीडीपी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही होते. यावेळी तारक रत्न यांना अचानक चक्कर आली. ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ कुप्पम येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बँगळुरूच्या नारायण हृदालय रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. शेवटचे काही दिवस ते कोमात केले. अखेर, काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना कार्डियाक अटॅक आला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हेही वाचा – स्मृती इराणींच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला किंग खान

त्यांच्या निधनामुळे साऊथ चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पुष्पा फेम अर्जुनसह अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

तारक रत्न यांचं संपूर्ण नाव नंदमूरी तारक रत्न आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ते ज्युनिअर एनटीआरचे चुलत भाऊही आहेत. २००३ मध्ये त्यांनी उकाटो नंबरमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.