Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अर्जून कपूरचा नवा म्युझिक व्हिडिओ 'दिल है दिवाना'चा टिझर प्रदर्शित

अर्जून कपूरचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘दिल है दिवाना’चा टिझर प्रदर्शित

टिझर पाहता 'दिल है दिवाना' या गाण्यात अर्जून च्या दोन भूमिकांची झलक पाहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

अर्जून कपूर लवकरच नव्या कोऱ्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘दिल है दिवाना’ असे असून याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या टिझरची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘दिल है दिवाना’ मध्ये अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या गाण्यातील अर्जून आणि रकुलच्या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. अर्जून कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा टिझर शेअर केला आहे. ”एक प्रेम काहाणी जी मजामस्तीने भरली आहे.” असे कॅप्शन दिले आहे. १७ एप्रिल रोजी हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

टिझर पाहता ‘दिल है दिवाना’ या गाण्यात अर्जून च्या दोन भूमिकांची झलक पाहायला मिळणार आहे. ”द गूड बॉय द बॅड बॉय” अशा दोन भूमिकांमध्ये तो दिसणार आहे. ‘दिल है दिवाना’ हे गाणे दर्शन रावल आणि झारा खान यांनी गायले आहे. शब्बीर अहमद लिखित या गाण्याची भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. तसेच तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. सध्या सगळीकडेच या गाण्याची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये या गाण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


- Advertisement -

हे वाचा- ‘हिंग,पुस्तक,तलवार’ ची भुरळ आता बॉलिवूडलाही, आयुष्यमान खुराना, तापसी पन्नूने केले मराठी वेब सिरीजचे प्रमोशन

- Advertisement -