घरमनोरंजन'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3' वेबसिरिजचा टीजर प्रदर्शित!!

‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ वेबसिरिजचा टीजर प्रदर्शित!!

Subscribe

टीझरमध्ये अगस्त्य(सिद्धार्थ) आणि रूमीचा(सोनिया)या दोघांचा रोमँटिक प्रवास दाखविण्यात आला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर लवकरच ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या लोकप्रिय वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटील घेवून येत आहे. या वेबसिरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. मार्मिक प्रेम कथा, अपारंपरिक कथाकथन, भावपूर्ण गीत आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडूनही कौतुक केले गेले होते. आता, एक नवीन कथा, नव्या कलाकारांसह या वेबसीरिजच्या सीझन 3 ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या वेबसिरिजशी जोडलेल्या नवीन अपडेटची प्रतिक्षा करत आहे. मात्र आता अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेबसिरिजच्या तिसऱ्या सिझनचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

डिजिटल प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीने सकाळी 11 वाजता सोशल मीडिया हँडलवर ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’चे टीजर रिलीज केले आहे. छोट्या पडद्यावरील सुपरस्चार सिद्धार्थ शुक्ला आणि नवोदित अभिनेत्री सोनिया राठी ही जोडी या वेबसिरिजमध्ये मुख्य कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहता प्रेम, आवड, हार्टब्रेक आणि लव ट्रॅंगलयावर वेबसिरिजची कथा आधारित आहे. टीझरमध्ये अगस्त्य(सिद्धार्थ) आणि रूमीचा(सोनिया)या दोघांचा रोमँटिक प्रवास दाखविण्यात आला आहे. यापूर्वी या वेबसिरिजचे पोस्टरही सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. ही वेबसिरिज प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ ही वेबसिरिज 29 मे 2021 पासून केवळ अल्ट बालाजीवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.


हे वाचा-  ‘मी तिला कधीचं आई म्हणणार नाही’, करिनासोबत असलेल्या नात्याचा साराने केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -