घरमनोरंजन‘लाल बत्ती’ चित्रपटाचा टीझर रिलीज

‘लाल बत्ती’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Subscribe

२६ जुलैला प्रदर्शित होणार चित्रपट

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. समाजमाध्यमांमध्ये हा टीझरविषयी व्हायरल होत असून याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे.

View this post on Instagram

सज्ज झालेत कमांडो एका मिशनसाठी. ह्या कारगिल विजय दिवशी मिळणार नव्या विजयाची बातमी. घेऊन येत आहोत 'लालबत्ती' २६ जुलैला… #Laalbatti #26July @mangeshdesaii #Tejas @bhargavi_chirmuley @meerajoshi_ @chhaya.kadam.75 #abhaydakhne #Rameshwani @actormanojjoshi @arvind_jagtap_official #KrishnaSoren @avinashvishwajeet #NileshGawande #DigambarTalekar #AtulSalve #SaiCinemaProductions @dedhiabrijesh @mediaone_pr @vizualjunkies A Film By – #GirishMohite Producer – #SantoshSonawdekar Story and Screenplay – #Abhaydakhane

A post shared by Laal Batti (@laalbattimovie) on

- Advertisement -

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमविषयी (QRT) या टीझर मधून सांगण्यात आले आहे. ‘QRT’ टीमला देण्यात येणारे खडतर प्रशिक्षण यात दाखवण्यात आले आहे. जिगरबाज पोलिसांची कहाणी उलगडणारा ‘लाल बत्ती’ चित्रपट लढण्याची प्रेरणा देणार आहे.

- Advertisement -

‘साई सिनेमा’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. दिग्दर्शन गिरीश मोहिते यांचे आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभले असून चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘लाल बत्ती’ हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार असून ‘लाल बत्ती’ चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी हे कालाकार या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -