घरमनोरंजन'सूर सपाटा'चा वेगवान टिझर रिलीज

‘सूर सपाटा’चा वेगवान टिझर रिलीज

Subscribe

'हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला कबड्डी... कबड्डी... म्हणायला भाग पाडेल' अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

आत्तापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. मात्र, अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे निर्माता हयांचा लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि. या निर्मितीसंस्थेचा ‘सूर सपाटा’ हा गावठी कबड्डीवरआधारित मराठी चित्रपट २२ मार्चला रिलीज होणार आहे. मोठ्या पडद्यावर खेळल्या जाणाऱ्या या कब्बडीची सध्या चर्चा सर्वत्र रंगत असून, त्याचा वेगवान आणि उत्कंठा वाढवणारा टिझर प्रेक्षकांची मने जिंकत आहे. उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली ‘सूर सपाटा’ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हापरिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो, हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्सचा ‘सूर सपाटा’ हा दुसरा चित्रपट असून या आधी त्यांनी ‘पेईंग  घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती.

अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीयपुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणिनिनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्येआपल्याला पहायला मिळतील. किशोर खिल्लारे, सुभाषगुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूरसपाटा’च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफाआमने-सामने येणार असून तूर्तास त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. विशेष म्हणजे ‘सूर सपाटा’ला माजी कबड्डीपटू अर्जुनपुरस्कार विजेते मा. श्री. शांताराम जाधव यांचे मोलाचेसहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रिय सहभाग असणार आहे. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजयमिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला असून, अभिनय जगताप चे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -