घरताज्या घडामोडीJhund Teaser launch : बिग बींच्या 'झुंड' सिनेमाचा टीझर आऊट ; यंगस्टर्ससोबत...

Jhund Teaser launch : बिग बींच्या ‘झुंड’ सिनेमाचा टीझर आऊट ; यंगस्टर्ससोबत दिसतायत Amitabh bachhan

Subscribe

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh bachhan) यांचा आगामी सिनेमा 'झुंड' (jhund) ची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. तेव्हापासून बिग बींचा हा सिनेमा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh bachhan) यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’ (jhund) ची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. तेव्हापासून बिग बींचा हा सिनेमा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. यामध्ये बिग बींशिवाय काही यंगस्टर्ससुद्धा दिसत आहेत. जे वेगवेगळ्या साहित्यापासून म्युझिक तयार करत आहेत. त्यानंतर एक म्युझिक वाजते. नंतर सर्व यंगस्टर्सची झुंड त्यांच्यामागे आणि त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात करते. या सिनेमात बिग बी एका प्रशिक्षकाच्या भुमिकेत पाहायला मिळाले आहेत.

टीझरचे म्युझिक धमाकेदार असून, चाहत्यांच्या पसंतीस आले आहे. ‘झुंड’ हा सिनेमा 4 मार्चला 2022 मध्ये रीलीज होणार आहे. बिग बी आणि त्यांची ही यंगस्टर्स झुंड काय कमाल करणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.’झुंड’ या सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भुमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. टीझरमधील अमिताभ बच्चन यांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

- Advertisement -


झुंड सिनेमाचे कथानक हे विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारीत आहे. त्यांनीही गरीब वस्तीमध्ये राहत असलेल्या मुलांकडून चांगली तयारी करुन एक फुटबॉलची दमदार टीम त्यांनी तयार केला. याच कथानकावर अमिताभ बच्चन यांचा नवा सिनेमा आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

हे ही वाचा –  Mumbai Unlock : फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई अनलाॅक; महापालिका टास्क फोर्सला शिफारस करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -