Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन पानिपत लढाईनंतरच्या भयाण वास्तवावर आधारीत 'बलोच' सिनेमाचं टिझर पोस्टर रिलीज

पानिपत लढाईनंतरच्या भयाण वास्तवावर आधारीत ‘बलोच’ सिनेमाचं टिझर पोस्टर रिलीज

बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Story

- Advertisement -

इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती.पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून यात प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde)यांची मुख्य भूमिका आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारा आहे. (Teaser poster release of ‘Baloch’ movie based on horrific reality after Panipat battle)

 

- Advertisement -

जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा थेटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहिये.तसेच सिनेमा कधी रिलीज होणार याची घोषणा सुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सिनेमाची घोषणा होताच प्रेक्षकांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला होता. सिनेमा कधी रिलीज होणार आता याकडे सर्व रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेतहे हि वाचा – Param Sundari title track : ‘मिमी’ सिनेमाच्या ‘परम सुंदरी’ गाण्यात दिसणार क्रिती सेनॉनचा ‘देसी’ अंदाज- Advertisement -

 

- Advertisement -