घरमनोरंजन‘ब्रह्मास्त्र’मधील 'देवा देवा' गाण्याचा टीझर रिलीज

‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ गाण्याचा टीझर रिलीज

Subscribe

दिग्दर्शक आयान मुखर्जी यांनी या गाण्याचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सांगितलं की, या चित्रपटातील हे पूर्ण गाणं सोमवारी ८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात येईल.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या केसरिया गाण्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील देवा देवा या गाण्याचा टीझर आज रिलीज केलं आहे. दिग्दर्शक आयान मुखर्जी यांनी या गाण्याचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सांगितलं की, या चित्रपटातील हे पूर्ण गाणं सोमवारी ८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात येईल.

‘देवा देवा’ या गाण्याला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरजीत सिंह याने गायले आहे. तसेच हे गाणं प्रीतमने कंपोज केलं असून या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत. हे गाणं पूर्णपणे रणबीर कपूरवर आधारित आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर आगीसोबत खेळताना दिसत आहे.

- Advertisement -

आगीसोबत खेळताना दिसला रणबीर

व्हिडीओमध्ये सुरूवातीला रणबीर कपूर म्हणजेच चित्रपटातील शिवा देवाला प्रार्थना करताना दिसून येत आहे. तसेच या टीझरमध्ये आलिया आणि अमिताभ यांची झलक सुद्धा दिसत आहे. हा टीझर पाहून संपूर्ण गाणं पाहण्यासाठी प्रेक्षक अधिकच आतुर झाले आहेत.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’ या दिवशी होणार प्रदर्शित
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसून येतील. तसेच अभिनेता शाहरूख खान सुद्धा चित्रपटात कॅमियो रोलमध्ये दिसून येईल. ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून हा हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.


हेही वाचा :‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; गाणं पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -