‘सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा’… रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर रिलीज

या टीझरमध्ये शमशेराची भूमिका साकरणाऱ्या रणबीर कपूरचा लूक आणि डायलॉग ऐकून अंगावर शहारे येत आहेत. रणबीर कपूर शिवाय या टीझरमध्ये संजय दत्तची झलक सुद्धा दिसत आहे

रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘शमशेरा’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचे टीझर सुद्धा रिलीज केले आहे. या टीझरमध्ये शमशेराची भूमिका साकरणाऱ्या रणबीर कपूरचा लूक आणि डायलॉग ऐकून अंगावर शहारे येत आहेत. रणबीर कपूर शिवाय या टीझरमध्ये संजय दत्तची झलक सुद्धा दिसत आहे. चित्रपटात रणबीर कपूर आणि संजय दत्तचा अंदाज खूप घातक असल्याचे दिसत आहे.

रणबीर कपूर साकारणार दोन भूमिका

टीझरमध्ये “सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा, कोई रोक ना पाएगा इसे, जब उठे ये बनके सवेरा’ असा डायलॉग रणबीर बोलताना दिसत आहे”. ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर दोन भूमिका साकारताना दिसेल. रणबीर कपूरचा हा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये तो दोन भूमिका साकारत आहे.चित्रपटातील रणबीर कपूरच्या एक पात्राचे नाव शमशेरा आहे तर दुसऱ्या पात्राचे नाव बल्लीआहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली आहे. शमशेरासाठी रणबीर कपूरने तलवार चालवायचा सराव केला तसेच तो घोडस्वारी देखील शिकला.

रणबीर कपूर आणि संजय दत्त आमने सामने
‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यामध्ये जबरदस्त फाइट सीन्स असणार आहेत. तसेच यातील काही फाइट सीन्स घोड्यावर बसून केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये फाइट सीनमध्ये एकूण ८० घोड्यांचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्राने केले असून रणबीर कपूर शिवाय या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा , रोनिर रॉय आणि सौरभ शुक्ला हे कलाकार आहेत.

२२ जुलै रोजी रिलीज होणार ‘शमशेरा’
१५० करोडच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलैला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे.