संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाचे टीझर रिलीज

या आगामी चित्रपटातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट २० जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या  चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

या टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील,सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी हे कलाकार दिसून येत आहेत. तसेच या टीझरमध्ये सोनाली आणि सचितचा अफलातून डान्स पाहायला मिळत आहे. तमाशा लाईव्ह चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासह सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात की, “तमाशा लाईव्ह या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाला तगडी स्टार कास्ट आणि उत्तम संगीत लाभलेली आहे.”

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. तसेच सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमोरे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. अमितराज, पंकज पडघन यांनी संगीत दिले असून क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

 

 

या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार ‘हे’ चित्रपट रिलीज