‘तिरसाट’ चित्रपटाचं टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘तिरसाट’ हा आगामी चित्रपट येत्या २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे, एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असून हे प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती यातना झेलाव्या लागतात याची थरारक गोष्ट ‘तिरसाट’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सने तिरसाट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उमेश शेडगे यांनी या चित्रपटाची सहनिर्माती केली असून निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचे लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
नुकतेच या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले असून यामध्ये प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीझरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ‘तिरसाट’ हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं “उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,” असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आल आहे. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.

 

 


हेही वाचा :‘लंडन मिसळ’चा झणझणीत तडका ; चित्रपटाचं पोस्टर रिलीज