घरताज्या घडामोडीNaagin 6 Launch Cancelled: लता दीदींच्या निधनानंतर तेजस्वी प्रकाशच्या नागिन ६...

Naagin 6 Launch Cancelled: लता दीदींच्या निधनानंतर तेजस्वी प्रकाशच्या नागिन ६ चा ट्रेलर लाँच सोहळा रद्द

Subscribe

नागिन ६ १२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाल्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात आला. दरम्यान लता दीदींच्या निधनामुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या नागिन ६ चा लाँच सोहळा रद्द करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर नागिन६ च्या निर्मात्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. निर्माती एकता कपूरचा नागिन ६ या शोचा ट्रेलर आणि कलाकारांनी नावे उद्या म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार होती. मात्र लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककला पसरली असताना नागिन ६चा लाँचिंग सोहळा रद्द करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

कलर्सच्या टीमने ही माहिती देत म्हटले की,७ फेब्रुवारी रोजी होणारा नागिन ६ चा ट्रेलर लाँच रद्द केला गेला असून, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागिन ६ १२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मंगळवारी म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील मंडळी, क्रिकेटपटू आणि राजकारणी सर्वांवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांनी लता दीदींना शेवटीचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी आणि शिवाजी पार्क येत हजेरी लावून त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील रविवारी लता दीदींना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेली होती. मात्र रविवारी सकाळी लता दीदींची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी सात वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –  Lata Mangeshkar: प्रभूकुंज ते शिवाजी पार्क, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -