घरनवरात्रौत्सव 2022‘कामाख्या’च्या रुपातील तेजस्विनीचं सौंदर्य तुम्ही पाहिले का?

‘कामाख्या’च्या रुपातील तेजस्विनीचं सौंदर्य तुम्ही पाहिले का?

Subscribe

अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून तेजस्विनी पंडित समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही आपल्या अनोख्या अंदाजात नवरात्रीच्या निमित्तानं देवीच्या वेगवेगळ्या रुपात नऊ दिवस प्रेक्षकांच्या समोर येत असते. यंदा देखील तिने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील फोटो शेअर करून महत्त्वपूर्ण असा प्रश्न मांडला होता. तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने ‘कामाख्या’ च्या रुपातील फोटो शेअर करून पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे.

हेही वाचाअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ‘अंबाबाई’ अवतार!

- Advertisement -

तिने या ‘कामाख्या’च्या रुपातील फोटो शेअर करून या रुपाचं महत्त्व असं लिहलं आहे की, “वेद, पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदी ही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अशाप्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे. तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी?”

View this post on Instagram

द्वितीय " कामाख्या " . . वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

- Advertisement -

तेजस्विनी या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होते. ती नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपल्या अनोख्या कलाकृतीचे फोटो शेअर करून महत्त्वपूर्ण प्रश्न मांडते. ती महाराष्ट्रातल्या देवीच्या वेगवेगळ्या रुपात अनेक समस्यांवर भाष्य करते. आता तिसऱ्या दिवशी ती कोणत्या रुपात दिसणार आहे? यांची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -