घरमनोरंजन‘महालक्ष्मी’च्या रूपात प्रकटली तेजस्विनी पंडित!

‘महालक्ष्मी’च्या रूपात प्रकटली तेजस्विनी पंडित!

Subscribe

महालक्ष्मीचं रूप सकारत तेजस्विनीने मांडली समाजातील सत्य परिस्थिती

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या देवीच्या रूपामध्ये तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. पहिल्या दिवशी अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या देवीच्या रूपातील फोटो शेअर करून महत्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तिसऱ्या दिवशी जरीमरी आईच्या रूपातील एक कलाकृती शेअर करून नदी व समुद्राच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस असून तेजस्विनी महालक्ष्मीच्या रूपात समोर आली आहे.  चौथ्या दिवशी तिने ‘महालक्ष्मी’च्या रूपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोद्वारे एक महत्वाच्या विषयावर भाष्य केले आहे.

View this post on Instagram

चतुर्थी "महालक्ष्मी" . . कराग्रे वसते लक्ष्मी…अर्थात तुझ्या हातात माझा निवास आहे. संपत्तीचं सर्वात मोठं माझं वरदान मी तुझ्या हाती दिलं….पण तू मात्र त्याची राखरांगोळी केलीस…स्वतः ची तिजोरी अधिकाधिक भरण्यासाठी तुझी राक्षसी चढाओढ सुरू झाली. मी सतत ‘फिरती’ राहणे हा माझा निसर्ग! मला डांबून ठेवून आयुष्य समृद्ध करणारं हे धन तू "काळं धन" करून अनेकांचा काळ ओढवला आहेस. तुझं हे लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलंय….. माझ्या सोनसळी वरदाना च तू तुझ्या हातांनीच मातेरं केल आहेस…तूच मातेरं केल आहेस ! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

- Advertisement -

“कराग्रे वसते लक्ष्मी…अर्थात तुझ्या हातात माझा निवास आहे. संपत्तीचं सर्वात मोठं माझं वरदान मी तुझ्या हाती दिलं….पण तू मात्र त्याची राखरांगोळी केलीस…स्वतः ची तिजोरी अधिकाधिक भरण्यासाठी तुझी राक्षसी चढाओढ सुरू झाली. मी सतत ‘फिरती’ राहणे हा माझा निसर्ग! मला डांबून ठेवून आयुष्य समृद्ध करणारं हे धन तू “काळं धन” करून अनेकांचा काळ ओढवला आहेस. तुझं हे लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलंय….. माझ्या सोनसळी वरदाना च तू तुझ्या हातांनीच मातेरं केल आहेस…तूच मातेरं केल आहेस !.”,असा सवाल तिने केला आहे.


‘कामाख्या’च्या रुपातील तेजस्विनीचं सौंदर्य तुम्ही पाहिले का?


तेजस्विनी पंडित आपले अनोखं रूप साकारत समाजाला भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नावर ती वेगवेगळ्या रूपातील कलाकृती सादर करताना दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून ती वेगवेगळ्या संकल्पना साकारत नारीशक्तीचा जागर करत असते. यंदाच्या नवरात्रीमध्ये तेजस्विनी विविध देवींची रूपं साकारत समाजातील प्रश्नावर व्यक्त होताना दिसत आहे.


अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ‘अंबाबाई’ अवतार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -