घरगणपती उत्सव बातम्यातेजस्विनीचा 'फिल्ममेकर बालगणेशा'!

तेजस्विनीचा ‘फिल्ममेकर बालगणेशा’!

Subscribe

आजपर्यंत अभिनेत्री तेजस्विनी पंडित केवळ तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना माहिती होती. मात्र गणपती बाप्पाच्या निमित्ताने तेजस्विनीची आणखी एक कला प्रेक्षकांसमोर आली आहे. अभिनयाबरोबरच तेजस्विनी एक उत्तम चित्रकारदेखील आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेली अनेक वर्ष आपल्या बहारदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘सिंधूताई सकपाळ’ या चित्रपटातून तेजस्विनीच्या अभिनयाचं कौतुक सगळ्यांनीच केलं. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटात तेजस्विनीचा वेगळी झलक प्रेक्षकांसमोर आली. मात्र केवळ एक अभिनेत्री म्हणून तेजस्विनी सगळ्यांना माहीत आहे. ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नसून ती चांगली डिझायनरही आहे आणि एक सुंदर चित्रकारही आहे.

- Advertisement -

तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आलेल्या बालगणेशाचं चित्र तेजस्विनीनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिने शेअर केलेल्या या बाल गणेशामुळे तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री बरोबर उत्तम चित्रकार असल्याचं तिच्या चाहत्यांना बघायला मिळालं आहे.

तेजस्विनीने तिच्या व्यवसायाशी निगडित बाप्पाचे चित्र रेखाटले आहे. बालगणेशाच्या चेहऱ्याच्या हावभावातून तो ‘फिल्म मेकर गणेशा’ असल्याचं समजतंय. खर सांगायचं तर तेजस्विनीने चित्रकलेचं कोणतंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं नाही. तरीही ती एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टसारखी चित्र रेखाटते. तेजस्विनीच्या चाहत्यांना तिची ही कला आता समजल्यामुळे तिच्याकडून आणखी चित्र पाहण्याची त्यांची इच्छा असणार हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -