Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनTejaswini Pandit : 'महाराष्ट्र हरलास तू'.. तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चत

Tejaswini Pandit : ‘महाराष्ट्र हरलास तू’.. तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चत

Subscribe

विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल काल लागला आहे. महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या तर आघाडीला केवळ 47 जागांवर समाधान मानावे लागले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा हा मोठा विजय आहे. दर दुसरीकडे मनसेला एकाही ठिकाणी खातं उघडता आलेलं नाही. मनोरंजन क्षेत्रातून राज ठाकरेंना पाठिंबा देणारे अनेक कलाकार होते. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही निकालानंतर केलेली पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे.

तेजस्विनीने ‘महाराष्ट्र हरलास’ असं पोस्टमध्ये लिहीलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तेजस्विनीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.


तेजस्विनी पोस्ट करत म्हणाली, ‘विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला 100 पैंकी 100… पण तरीही… राजसाहेब ठाकरे. एकनिष्ठ, सदैवसोबत… आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू’ , अशा शब्दांत तेजस्विनी व्यक्त झाली आहे. आपण आजही राज ठाकरेंसोबतच असल्याचं तिने स्पष्ट केले आहे.

यावेळी राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरेही पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात होते. सर्व उमेदवारांसह आपल्या मुलासाठी राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या. पण, यंदा मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. विद्यमान आमदार राजू पाटील यांना देखील पराभावाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे अमित ठाकरे यांना देखील माहिममधून विजयी होता आले नाही. त्यामुळे मनसेची मोठी निराशा झाली आहे.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde