Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'Comming Soon' तेजप्रताप यादव झाला ट्रोल

‘Comming Soon’ तेजप्रताप यादव झाला ट्रोल

पोस्टर ट्विट केल्यानंतर मात्र तेजप्रतापला बऱ्याच लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आपल्या चित्रपटाचं टायटल हिंदी मध्ये असूनही पोस्टरवर त्यानं इंग्रजीमध्ये 'Coming Soon' ऐवजी 'Comming Soon' असं लिहिलं आहे.

Related Story

- Advertisement -

बिहारचे पूर्व मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादवच्या मुलानं चित्रपटसृष्टीत आपलं पहिलं पाऊल ठेवलं आहे. याबाबत तेजप्रतापनं ट्विटवरून ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवर त्यानं चित्रपटाचं पोस्टर पोस्ट केलं असून त्यावर त्याचा फोटो दिसत आहे. ‘रुद्रा द अवतार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हे पोस्टर ट्विट करून त्यानं सर्वांनाच धक्का दिला आहे. कारण तेजप्रताप चित्रटात काम करत आहे याची कोणालाच माहिती नव्हती.

पोस्टरवरून झाला ट्रोल

- Advertisement -

पोस्टर ट्विट केल्यानंतर मात्र तेजप्रतापला बऱ्याच लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आपल्या चित्रपटाचं टायटल हिंदी मध्ये असूनही पोस्टरवर त्यानं इंग्रजीमध्ये ‘Coming Soon’ ऐवजी ‘Comming Soon’ असं लिहिलं आहे. स्पेलिंगमध्ये झालेल्या या चुकीमुळं नेटिझन्सनं त्याला जबरदस्त ट्रोल केलं आहे. सर्व भावांमध्ये तू जास्त शिकला असूनही तुला साधं स्पेलिंग येत नाही का? असंही काही जणांनी म्हटलं आहे.

राजकीय नेत्यांची मुलं चित्रपटात

- Advertisement -

राजकीय नेत्यांची मुलं चित्रपटात येणं आता नवीन राहिलेलं नाही. तेजप्रताप बऱ्याच दिवसांपासून राजकारणापासून दूर राहत होता. तर काही महिन्यांपूर्वीच त्याचं बिहारचे पूर्वमंत्री चंद्रिका प्रसाद राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याबरोबर लग्न केलं आहे. हे लग्न खूपच गाजलं होतं. दरम्यान याआधी रामविलास पास्वानचा मुलगा चिराग पास्वाननंदेखील एक चित्रपट केला होता. मात्र त्याला यश मिळालं नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखनं मात्र स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपलं स्थान मिळवलं. आता तेजप्रतापचं नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

 

 

- Advertisement -