घरमनोरंजनआणि तेजस्वीनी पंडित ठरली ट्रेंडसेटर!

आणि तेजस्वीनी पंडित ठरली ट्रेंडसेटर!

Subscribe

तेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केलाय. असे फोटोशूट करण्याचे तेजस्विनीचे हे तिसरे वर्ष आहे.

View this post on Instagram

अष्टमी "गावदेवी" . . थांब घाव घालू नकोस……याच्या मुळावर घालू नकोस ….समस्येच्या मुळावर घाल…. इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी…..या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा …यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ….जंगलं साफ करा वस्त्या वाढवा….रस्ते बनवा…सोय फक्त स्वत:चीच बघा ….इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात…. अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय….तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील…. . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks @jyotsnapethkar and @rjadhishh #aarey #saveaarey #gaodevi #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

- Advertisement -

पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होतं. आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केले. दूस-या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिस-या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं वाटलं.“नवरात्री म्हणजे फक्त नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये फोटो न काढता आता अनेकजणं कल्पकतेने काही नवं करतायत, ह्याचा आनंद आहे. अनेक लोकं मला सोशलमीडियावरून टॅगही करतात. अशावेळी खूप छान वाटतं.”

View this post on Instagram

तृतीय " जरीमरी आई" . . माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिक च्या पिशव्या , अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून… असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी…माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

- Advertisement -

तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -