घरताज्या घडामोडीVideo: अंकिता लोखंडेच्या 'अरे रे आरे क्या हूआ' गाण्यावर दिलखेच अदा

Video: अंकिता लोखंडेच्या ‘अरे रे आरे क्या हूआ’ गाण्यावर दिलखेच अदा

Subscribe

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे या दिवसात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सध्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी अनेक डान्स व्हिडिओ अंकिता सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकिता माधुरी दीक्षितच्या ‘अरे रे अरे’ (Are Re Are Song) या गाण्यावर दिलखेच अदांमध्ये डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडेने काळ्या रंगाचा आउटफिट घातला आहे. या आउटफिटमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमधील अंकिताच्या एक्सप्रेशनमुळे चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर अंकिताचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताच काही मिनिटातच व्हिडिओला ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अंकिताच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेत अंकिता सुशांत सिंह राजपूत सोबत प्रमुख भूमिकेत होती. ‘पवित्र रिश्ता’ व्यतिरिक्त अंकिता ‘एक थी नायका’ आणि ‘शक्ति-अस्तित्व के एहसास’ यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे. गेल्या वर्षी अंकिताने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बागी ३’मध्ये अंकिता दिसली होती.


हेही वाचा – अनिता हसनंदानीनं दिली गुडन्यूज, एकताने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -