सेलेब्रेटी शेफ जगी जॉनचा गूढ मृत्यू; घरात आढळला मृतदेह

जगी जॉन शेफ

टिव्ही अभिनेत्री आणि सेलेब्रेटी शेफ जगी जॉन आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडली आहे. जगी आपल्या आईबरोबर केरळच्या कुरवनकोरम मध्ये एका फ्लॅटमध्ये रहात होती. घरातील किचनमध्ये ती मृत अवस्थेत सापडली. पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहे. अद्याप तीचा मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घटनेची चौकशी सुरू आहे. मंगळवारी या घटनेची, घटना स्थळाची आणि पोस्टमार्टम करण्यात येईल. त्यानंतर या घटनेबाबत आणखी खुलासा करण्यात येईल. विशेष म्हणजे या वेळी तीची आई घरातच होती. सध्या तीची आई मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यात आहे. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची आईची मानसिक स्थिती नाहीये.

जगीच्या शेजाऱ्यांनी पहिल्यांदा जगीचा मृतदेह बघीतला. कारणच्या जगीच्या मित्राने त्यांना जगी कुठे हे बघायला सांगितले. कारण बऱ्याचवेलापासून जगी फोन उचलत नव्हती. त्यानंतर पोलिसांना शेजाऱ्यांनी याची माहिती दिली.
जगी टिव्हीवर जगीज ‘कुकबुक’ नावाचा कुकरी शो करते. ती अनेक कुकरी शो आणि ब्यूटी व पर्सनॅलिटी शो मध्ये जज म्हणून काम करायची.