Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज रस्ते अपघातात जखमी, १८ लाखांच्या बाईक रायडिंग...

टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज रस्ते अपघातात जखमी, १८ लाखांच्या बाईक रायडिंग दरम्यानची घटना

सध्या सोशल मीडियावर साईच्या अपघाताचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.

Related Story

- Advertisement -

टॉलिवूडमधील(tollywood) लोकप्रिय अभिनेता साई धरम तेज(Sai Dharam Tej) शुक्रवारी रात्री बाईक अपघातात जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना शुक्रवारी(10 सप्टेंबर) रात्री दुर्गामाचेरुवु केबल पुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, साई त्याच्या 18 लाख आणि तब्बल 1160 स्पोर्ट्स बाईकवर जात असताना त्याची बाईक घसरली आणि तो जागीच बेशुद्ध होऊन गंभीर जखमी झाला. या दरम्यान त्याने हेल्मेटसुद्धा घातले होते. त्यांना जखमा झाल्या आहेत. साई धरम तेजला अपघातानंतर ताबडतोब जवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्याला योग्य आणि पुढील उपचारा करीता दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचे कळतेय. यानंतर साई धरम तेजच्या पीआर टीमने एक अधीकृत वृत्त जारी करत साई आता ठिक असल्याचे सांगितले आहे.(Telugu actor Sai Dharam Tej injured in road accident, condition stable)

साई धरम तेजच्या टीमने सांगितल की,“साई धरम तेज पूर्णपणे ठीक आहे आणि त्याची तब्येत आता हळूहळू सुधारत आहे..काळजी करण्यासारखे काहीच नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्याची तब्येत स्थिर झाल्यानंतर, त्याला उपचार सुरू ठेवण्यासाठी अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Dharam Tej (@jetpanja

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर साईच्या अपघाताचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये साईचे डोळे ,छाती,कंबर आणि शरीराचे इतर काही भागावर गंभीर दुखापत झाल्याचे दिसतेय. अपघाताची बातमी समोर आल्यानंतरच अभिनेत्याचा भाऊ वैष्णव तेज, काका पवन कल्याण आणि चुलत भाऊ वरुण तेज यांच्यासह कुटुंबातील सदस्य रुग्णालयात पोहोचले. मात्र पोलिसांनी देखील या दुर्घटनेची संपुर्ण तपासणी केली असता साईने सर्व नियमांने पालन केले होते हेल्मेट देखील घातला होता मात्र रस्त्यावरील चिखलामुळे त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – शाहीर – रुचिकाच्या घरी अवतरली ‘नन्ही परी’

- Advertisement -