बॉलिवूड सिनेविश्वाला लवकरच एक जबरदस्त कलाकृती मिळणार आहे. ‘रांझणा’नंतर आता ‘तेरे इश्क में’ या सिनेमाच्या माध्यमातून आनंद एल राय एक जबरदस्त सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ‘तेरे इश्क में’ या शीर्षकातचं सिनेमाविषयी बरंच काही सांगितलंय. या सिनेमातून दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉनची नवीकोरी जोडी आपल्या भेटीस येत आहे. (Tere Ishk Mein new movie teaser has been released)
‘तेरे इश्क में’चा टिझर रिलीज
प्रेम म्हटलं की दुरावा आलाच आणि हा दुरावा वाढला तर? ते प्रेम मिळवण्यासाठी मनात जी आग लागते आणि ते न मिळाल्यानंतर उसळणारी बदल्याची भावना माणसाला अत्यंत क्रूर बनवू शकते. या सिनेमाचा टिझर पाहिल्यानंतर अशाच भावनांची जाणीव होतेय.
सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला हा टिझर अवघ्या काही तासांतच प्रेक्षकांनी पसंत केला आहे. आतापर्यंत या सिनेमाचे 2 टिझर प्रदर्शित झाले. ज्यातील पहिल्या टीझरमध्ये धनुष दिसतोय तर दुसऱ्या टिझरमध्ये क्रिती. दोघांचाही अवतार पाहता हे प्रेम आहे की सुडाची भावना? असा प्रश्न पडतोय.
काही तासांतच मिलियन व्ह्यूज
‘तेरे इश्क में’चा पहिला टीझर आतापर्यंत अनेकांनी पाहिलाय. ज्यामध्ये धनुष दिसतोय. वाढलेली दाढी, मळकटलेले कपडे आणि हातात विस्तव. असा धनुषचा खतरनाक लूक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. या टीझरमध्ये धनुष धावत येतो आणि एका भिंतीवर रॉकेलची बॉटल फेकतो. त्यातून आगीचा मोठा भडका उडतो. या टीझरने आतापर्यंत मिलियनचा टप्पा पार केला आहे.
तर दुसऱ्या टीझरमध्ये दंगल सुरु असलेल्या भागातून क्रिती चालत येताना दिसते. तिच्या हातात रॉकेलचा कॅन दिसतोय आणि पुढे ती अंगावर रॉकेल ओतून घेते. त्यानंतर लायटर पेटवते. असा हा टिझर ३ तासांपूर्वी प्रदर्शित झाला असून या व्हिडीओला 40 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
कधी रिलीज होणार?
माहितीनुसार, आनंद एल राय यांचा ‘तेरे इश्क में’ हा सिनेमा येत्या 28 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या सिनेमात धनुष आणि क्रितीसोबत आणखी कोणकोण झळकणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. पण एकूणच टिझर पाहून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आग लावणार असे वाटते आहे.
हेही पहा –
Chhaava : देशातच नव्हे तर परदेशातही रिलीज होणार छावा, कधी आणि कुठे?