प्रेम व कुटुंब यांच्या जादूचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. कारण ज्यांचे कौटुंबिक चित्रपट पाहणं सर्वांनाच आवडतं अशा सूरज आर. बडजात्या यांनी ओटीटी क्षेत्रात प्रवेश केला आहे.
मनाला स्पर्श करणारे कथानक आणि कौटुंबिक मूल्यांमध्ये सामावलेला वारसा या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन राजश्री प्रोडक्शन्स ‘बडा नाम करेंगे’ ही सिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या माध्यमातून राजश्री प्रोडक्शन बहुप्रतिक्षित डिजिटल पदार्पण करत आहे. ही सिरीज आपल्या मूळ संस्कृतीची आठवण करून देणारी प्रेमगाथा आहे. पालाश वासवानी यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिरीजचे कथानक प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल. ही सिरीज लवकरच फक्त सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
या सिरीजचा टीझर नुकताच रीलीज झालेल्या टीझरमध्ये कुटुंबामधील आनंदी, प्रेमळ व अद्वितीय नात्यांनी भरलेल्या कथानकाची झलक पाहायला मिळते. सिरीज ‘बडा नाम करेंगे’ रिषभ व सुरभी यांच्या प्रवासाला सादर करते, ज्यांच्या अरेंज मॅरेजला त्यांच्या गतकाळाच्या उलगड्यानंतर सुरेख व अनपेक्षित वळण मिळते. उत्साही साहसी कृत्ये व क्षणांदरम्यान त्यांच्यामध्ये अपेक्षांच्या पलीकडे नाते जुळते. ते त्यांच्या मनाचे ऐकतील का की त्यांच्या जीवनाला मार्ग दाखवणाऱ्या पवित्र परपंरांचा आदर करतील का?
ओटीटी पदार्पणाबाबत मत व्यक्त करत सूरज आर. बडजात्या म्हणाले, ”या सिरीजचे माझ्या मनात खास स्थान आहे. ‘बडा नाम करेंगे’मधून आम्ही सुरेख नातेसंबंध, दृढ प्रेम आणि कौटुंबिक मूल्याची ताकद दाखवत आहोत. जीवनातील बदलत्या गतीमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे आणि मला प्रेक्षकांसमोर ही हृदयस्पर्शी कथा सादर करण्याचा आनंद होत आहे. सोनी लिव्हसोबतचा सहयोग अद्भुत अनुभव राहिला आहे. आम्ही या सिरीजच्या निर्मितीसाठी अथक मेहनत घेतली आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक यावर कौतुक व प्रेमाचा वर्षाव करतील.”
मनाला स्पर्श करणाऱ्या कथा सादर करण्यासाठी प्रसिद्ध राजश्री प्रोडक्शन्स निर्मित सिरीज ‘बडा नाम करेंगे’मध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे कंवलजीत सिंग, अल्का आमिन, राजेश जैस, चित्राली लोकेश, राजेश तेलंग, अंजना सुखानी. यांचे सर्वोत्तम परफॉर्मन्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील.
प्रेम व कुटुंबाची मोहकता अनुभवण्यास सज्ज राहा कारण ‘बडा नाम करेंगे’ ही सिरीज सर्वोत्तम कौटुंबिक मनोरंजन सादर करणार आहे. पहा सिरीज लवकरच फक्त सोनी लिव्हवर!
हेही वाचा : Allu Arjun : अकारण त्याला अडकवलं जातंय… अल्लू अर्जुनच्या सपोर्टमध्ये बोनी कपूर
Edited By – Tanvi Gundaye