अभिनेत्री दीपिका पादुकोण आज इंडस्ट्रीतील सर्वात टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कन्नड सिनेमातून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केलेल्या दीपिकाने आज बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिका शालेय जीवनात स्पोर्ट्स प्लेअर होती. ती राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये खेळली आहे. शाळेत असताना तिचा संपूर्ण फोकस खेळावर होता. खेळात करिअर करण्याचं तिने ठरवलं होतं. पण वयाच्या आठव्या वर्षी तिने मॉडेल म्हणून जाहिरातीत काम केलं होतं. नंतर दहावीत असताना तिने तिचा फोकस बदलला आणि मॉडेलिंगमध्ये येण्याचं ठरवलं. आपल्या सर्वांनाच माहित आहे की कॉकटेल, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, राम-लीला, पिकू, जवान, पठाण अशा हिंदी सिनेमांसह तिने हॉलिवूड ॲक्शन सिनेमा रिटर्न ऑफ झेंडर केज मध्येही काम केलं आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटांव्यतिरिक्त अनेक व्यवसायांमधून देखील प्रचंड कमाई करते. चित्रपटांमध्ये भरघोस फी आकारण्यासोबतच दीपिका एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. अलीकडेच दीपिकाने तिचा पती अभिनेता रणवीर सिंग सोबत शाहरुख खानच्या घर ‘मन्नत’ जवळ एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे, ज्याची किंमत जवळपास 119 कोटी रुपये इतकी आहे.
दीपिका ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी रुपये घेते. दीपिकाने 500 कोटींची संपत्ती स्वबळावर कमावली असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय दीपिका एंडोर्समेंट आणि तिच्या बिझनेसमधूनही करोडोंची कमाई करते.
अभिनेत्रीने 2018 मध्ये केए प्रोडक्शन नावाने तिचे प्रोडक्शन हाऊस उघडले. या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘छपाक’ हा चित्रपट बनवण्यात आला होता.
याशिवाय दीपिकाचा स्वतःचा स्किन केअर ब्रँड 82°E आहे, ज्यातून ती दरवर्षी करोडो रुपये कमवते.
इतकंच नाही तर दीपिकाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे, ज्यातूनही तिची चांगली कमाई होते, याशिवाय अभिनेत्रीने अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.
सध्या दीपिका तिची मुलगी दुआची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे.
हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवतात ?
Edited By – Tanvi Gundaye