घरमनोरंजन'ठाकरे' चित्रपटाची कोटीच्या कोटी उड्डाणे!

‘ठाकरे’ चित्रपटाची कोटीच्या कोटी उड्डाणे!

Subscribe

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत शिवसैनीकांनी केलं. पहाटे ४ वाजल्यापासूनच शिवसैनीकांनी थिएटरबाहेर गर्दी केली होती. अपेक्षेप्रमाणेच ‘ठाकरे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आणि यशस्वी झाला. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दकीने बाळासाहेबांची भुमिका साकारली आहे.

पहिल्याच दिवशी ६ कोटींचा गल्ला

मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांवर तयार करण्यात आलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटासाठी २० कोटी खर्च करण्यात आले होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मीती केली आहे. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. बहूचर्चित ‘ठाकरे’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी तिकीट बारीवर हिट ठरला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने सहा कोटीचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट साधारण ३ कोटी कमवेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र पहिल्याच दिवशी दुपटीने कमवत हा चित्रपट हिट ठरला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -


‘ठाकरे’ या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. चित्रपटात बाळासाहेबांच्या भुमिकेत नवाजुद्दीन तर मीनाताईंच्या भुमिकेत अमृता राव आहे. चित्रपटाबरोबरच नवाजुद्दीनने साकारलेल्या भुमिकेचे कौतूक होत आहे. अनेक प्रसंगामध्ये नवाजुद्दीनमध्ये बाळासाहेबांचा भास झाल्याचे प्रेक्षकांच म्हणणं आहे.


हेही वाचा – Movie Review : ‘ठाकरे’ चित्रपटात गद्दारांना स्थान नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -