घरमनोरंजनसध्या ठाकरे चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग ठरतेय चर्चेचा विषय

सध्या ठाकरे चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग ठरतेय चर्चेचा विषय

Subscribe

स्वत: उद्धव ठाकरे या चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंगच्या रेकॉर्डींगवेळी उपस्थित राहिले.

असे खूप कमी चित्रपट असतात, ज्यांची मुहूर्तापासून चर्चा होते. ‘ठाकरे’ हा त्यातलाच एक सिनेमा. या चित्रपटात प्रेक्षकांसमोर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती करणार आहेत. याआधी चित्रपटाच्या मुहूर्ताची चर्चा होती तर आता चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी उपस्थिती लावली आहे. नुकतेच यशराज स्टूडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भुमिकेत दिसणार आहे.

गाण्यातून ऊर्जा मिळते- उद्धव ठाकरे

यावेळी एरवी राजकारणावर बोलणारे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल भरभरून बोलले. त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेली ते म्हणाले, “या गाण्यातून एक प्रकारची ऊर्जा मिळते. रोहन-रोहन यांनी इतकं उत्साहवर्धक गाणं बनविले आहे की, हे गाणं ऐकल्यावर कोणीही त्याच्या चालीवर ताल धरल्याशिवाय राहणार नाही. पद्मश्री सुनील जोगी यांनी हे गाणं अतिशय प्रखर आणि अर्थपूर्ण लिहिले आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून चित्रपटाला अप्रतिम रूप दिलेले आहे. पूर्वशी राऊत आणि विधिता राऊत या दोघींना मी माझ्या डोळ्यासमोर लहानाचं मोठं होत असताना पाहिले आहे आणि आता त्यांना खंबीर निर्मात्यांच्या भूमिकेत पाहताना मला फार आनंद होत आहे.” शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच त्यांनी यावर तब्बल चार वर्षे काम केले आहे. चित्रपटाचे निर्मातेही राऊत हेच आहेत. अभिजीत पानसे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

नवाजच्या लूकची चर्चा

ठाकरे चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता नवाजउददीन सिद्दीकी आहे. ठाकरे चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर लॉन्च नंतर नवाजच्या या लूकची खूप चर्चा झाली. या लूकमध्ये नवाज हूबेहूबे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दिसतो. अनेकांना पहिल्या पोस्टरमध्ये खुद्द बाळासाहेब असल्याचा बास झाला होता. त्याच्यावर खूप मेहनत घेतली आहे. नवाजच्या लूकमुळेच या चित्रपटाच्या चर्चेला सुरूवात झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -