घरमनोरंजनThalaivii Box Office Collection : 'थलायवी' बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला गल्ला जमवण्यात...

Thalaivii Box Office Collection : ‘थलायवी’ बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला गल्ला जमवण्यात ठरला अपयशी

Subscribe

पहिल्या वीकेंडला चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी होते. तीनही भाषांचा समावेश करून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन भारतात 1.78 कोटींपर्यत्न पोहोचले होते.

बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री कंगना रनौतचा(Kangana Ranaut) ‘थलायवी'(Thalaivii) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चमक दाखवू न शकल्याचे तसेच पूरता आपटल्याचे दिसत आहे. पहिल्या वीकेंडला चित्रपटाने फक्त 4.86 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 10 सप्टेंबरला रिलीज झाला होता पण तीन दिवसात 5 कोटींचा टप्पाही गाठू शकला नाही. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.(Thalaivii Box Office Collection Day 3)

पहिल्या वीकेंडला थलावीच्या हिंदी भाषेतील चित्रपटाने एकूण कमाई सुमारे 1 कोटी होती. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी हिंदीत 25 लाख, शनिवारी 30 लाख आणि रविवारी 45 लाखांची कमाई केली. जर तुम्ही या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनची तुलना अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाशी केली तर अक्षयच्या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला देशभरात 15 कोटींची कमाई केली होती. कंगनाचा हा चित्रपट ‘लबाम’ या प्रादेशिक चित्रपटाला तीव्र स्पर्धा देत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

पहिल्या वीकेंडला चित्रपटाचे कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1.64 कोटी इतके होते तरशुक्रवारी चित्रपटाने 1.44 कोटींची कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या वीकेंडला चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी होते. तीनही भाषांचा समावेश करून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन भारतात 1.78 कोटींपर्यत्न पोहोचले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

 चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारित 

हा चित्रपट कंगनाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट म्हणता येईल. कंगनाने केलेली मेहनत या चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते. सोशल मीडियावरही ,प्रेक्षक आणि समिक्षकांकडून कंगनाचे थलायवीसाठी प्रचंड कौतुक होत आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री झालेल्या दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी अगदी लहान वयातच तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनय कारकीर्द सुरू केली. थोड्याच वेळात, त्याने एक उच्च स्थान देखील प्राप्त केले.


हे हि वाचा – HBD:’विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल जादा सावधान’ पर्यंत,आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पाडली वेगळी छाप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -