Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'थप्पड'ची तीन दिवसात १५ कोटी रूपयांची कमाई!

‘थप्पड’ची तीन दिवसात १५ कोटी रूपयांची कमाई!

Subscribe

चित्रपट प्रदर्शनानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे.अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमा २८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला यानंतर अवघ्या तीन दिवसात हा भरगोस कमाई करत आहे.

थप्पड हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचे दिसत आहे. त्यामुळे घरगुती हिंसाचार तसेच पूर्वापारपासून चालत आलेल्या मानसिकतेवर आधारीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. या संबंधीची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

 

तीन दिवसात ‘थप्पड’ची कमाई

चित्रपट प्रदर्शनानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे.अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमा २८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला यानंतर अवघ्या तीन दिवसात हा भरगोस कमाई करत आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात १५ कोटींची कमाई केली आहे.

तीन दिवसांची कमाई

- Advertisement -

थप्पड या सिनेमात एका पुरूषाने स्रिला कानाखाली मारत असल्याची ही कथा आहे. ‘या सिनेमाने पहिल्या दिवशी ३.०७ कोटी, दुसऱ्या दिवशी ५.०५ तर तिसऱ्या दिवशी ६.५४ इतकी कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे’. या संबंधित माहिती चित्रपट व्यापारी तरण आदर्श यांनी दिली आहे. चित्रपटात तापसी पन्नूसह रत्ना पाठक शाह, मानव कौल, तन्वी आजमी, दिया मिर्झा आणि राम कपूर या कलाकारांची देखील सिनेमात वर्णी लागली आहे.

- Advertisment -