घरमनोरंजन...म्हणून मधुबाला आजारी असताना शेवटच्या काळात किशोरकुमार यांनी तिला एकटे सोडले

…म्हणून मधुबाला आजारी असताना शेवटच्या काळात किशोरकुमार यांनी तिला एकटे सोडले

Subscribe

अभिनेत्री मधुबाला आणि किशोर कुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या चित्रपटांमध्ये ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकीट’ सारख्या चित्रपटांचा समावेश होता. असे म्हटले जाते की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचीही जवळीक वाढली आणि प्रेमाचे नाते निर्माण झाले. 1960 मध्ये या दोघांनी लग्न केले. या लग्नानंतर मधुबालाची तब्येत खालावत गेल्याचे सांगितले जात आहे.

तब्येत बिघडली असताना अशा परिस्थितीत किशोर दा मधुबालाला लंडन फिरायला घेऊन गेले. तेथे तिला बरं नसल्याने डॉक्टरांचे उपचार करण्यात आले. तेथे केलेल्या तपासणीत मधुबालाच्या हृदयात एक छिद्र आहे आणि ती काही वर्षे जगेल असे डॉक्टरांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात परतल्यानंतर किशोर दा यांनी मधुबालाला कार्टर रोडवरील एका घरात हलवले.

- Advertisement -

माध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, मधुबाला आजारी असतानाही किशोर कुमार महिन्यातून केवळ एकदाच तिला भेटायला जायचे. किशोर कुमार यांना असे वाटायचे की, भेटायला गेल्यास मधुबाला भावनाप्रधान आणि अधिक भावनिक होतील आणि जे तिच्या हृदयासाठी चांगले राहणार नाही. त्याचबरोबर किशोर कुमार यांनी मधुबालाची काळजी घेण्यास असमर्थता दर्शविली होती. किशोर कुमार यांची दिनचर्या ही व्यस्त होती. या कारणानेच मधुबाला तिच्या जीवनाच्या शेवटच्या काळात एकट्याने मोठ्या अडचणींना सामोरे गेली होती. मात्र 23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबाला हिने अखेराचा श्वास घेतला आणि त्यांच्या संसार अर्ध्यातूनच कायमचा सोडून जगाचा निरोप घेतला.

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -