घरमनोरंजनम्हणूनच मीरा अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले” ...अमृता खानविलकर

म्हणूनच मीरा अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले” …अमृता खानविलकर

Subscribe

चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जवळपास माझ्यासारखीच आहे. मी तिच्याशी खूप चांगल्या तऱ्हेने समरूप होऊ शकते

‘वेल डन बेबी’ हा मराठी चित्रपट लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते यांच्यासोबत एका हलक्या फुलक्या कौटुंबिक नाट्य असलेल्या या मराठी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा लक्षात राहण्याजोगा परफॉर्मन्स देण्यास सज्ज झाली आहे. मीराच्या भूमिकेत, अमृताने एका अशा स्त्रीची भूमिका साकारली आहे, जी वैवाहिक अडचणींना सामोरे जात असतानाच, अनपेक्षित गर्भधारणा आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये होणार्‍या एकूणच बदलांशी संबंधित आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या अनुभवाविषयी बोलताना अमृता म्हणाली, “वेल डन बेबी ही एक अतिशय खास कथा आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या अशा भिंगातून ती नातेसंबंधांवर भाष्य करते. या चित्रपटामुळे मला हे समजायला मदत झाली की आपण घेतलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो आणि त्याच वेळी आपले संबंध कसे विकसित होत जातात, हे देखील मला समजले. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जवळपास माझ्यासारखीच आहे. मी तिच्याशी खूप चांगल्या तऱ्हेने समरूप होऊ शकते, तिला समजून घेऊ शकते आणि त्यामुळे चित्रपटातील मीरा मी अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले.”प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील अशा जोडप्याभोवती फिरते, जे त्यांच्या वैवाहिक समस्यांसोबत झगडत असताना त्यांना लक्षात येते की त्यांना मूल होणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचा खास प्रीमिअर भारतात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 9 एप्रिल रोजी होणार आहे.अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडियच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अमृताने पोस्ट केलेल्या प्रत्येक पोस्ट वर चाहते तसेच अनेक कलाकार लाइक आणि कमेंटचा वर्षाव करतात. अमृताचे इंस्टाग्राम अकाऊंट वर चक्क १.५ मिलियन फॉलोवर्स आहेत.


हे हि वाचा – कोरोनाचा कहर मराठी सिनेमांवर, ‘झिम्मा’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -