घरमनोरंजनऍक्शनचा तडका असलेला 'फेमस' चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

काही चित्रपटांमध्ये अनेक कलाकार हिरो असतात, विशेषतः ऍक्शनपटात ही बाब अधिक आढळून येते. अशातच भर घालत ‘गवसाने प्रॉडक्शन हाऊस’ आणि ‘गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस’ प्रस्तुत तसेच ‘ए. जी प्रॉडक्शन हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ हा नवाकोरा ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली असून या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

नुकत्याच लाँच झालेल्या ‘फेमस’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये असे पाहायला मिळतंय की, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. अर्थात पोस्टर पाहून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की नायिकेसाठीची मुख्य कलाकारांची धडपड डोळ्यासमोर स्पष्ट दिसतेय. आता मात्र ही पाठमोरी नायिका कोण आहे याचा प्रत्येकजण तर्कवितर्क लावतोय. चित्रपटातील मुख्य नायिकेची झलक पाहण्यासाठी आता साऱ्यांचीच उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे आणि ही उत्सुकता आणखी काही दिवस अशीच राहणार आहे कारण चित्रपटातील मुख्य नायिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास काही क्षणाचा अवलंब आहे.

- Advertisement -

तर महेश आणि स्वरूप यांच्यात नायिकेला कोण मिळवणार ही चुरशीची लढाई चित्रपटात पाहणंही रंजक ठरेल. तर या चित्रपटात मेघा शिंदे, साक्षी जाधव, प्रदीप शिंदे, विवेक यादव या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. तर चित्रपटात बालकलाकार म्हणून शौर्य प्रदीप चाकणकर आणि श्रीतेज प्रसाद चाकणकर यांनी चांगलीच धमाल केलीय.


हेही वाचा :

एमसी स्टॅनने इंस्टाग्राम लाईव्ह आणि लाईक्समध्ये शाहरुख, विराटला देखील टाकलं मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -