आर्थिक संकटाशी झुंजताना ‘या’ अभिनेत्याचा शेवट झाला रिक्षात

अभिनयाच्या कारकिर्दीत लढा देताना या अभिनेत्याचा शेवट झाला आहे

अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक कलाकारांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळते. तर अनेकांना खडतर प्रवास करावा लागतो. मात्र कधीकाळी अशी वेळ येते की हातात कोणतही काम नसते. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभे राहते. मात्र ही निराशा सहन करणं अनेकांना कठीण जाते. काही यातून बाहेर येतात तर काही या निरेशेला बळी जातात. असाच एक टॉलिवूडमधील अभिनेता त्याच्या या संकटाशी झुंज देताना या निराशेला बळी गेला आहे. या अभिनेत्याचे नाव विरुटचगकंथ असून तो चक्क रिक्षामध्ये मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून स्वत:चे अस्तित्व बनविण्यासाठी प्रयत्न करताना या अभिनेत्याचे निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. झोपेतच या अभिनेत्याने त्याचा शेवटचा श्वास घेतला असून त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

मात्र अद्याप अजूनही त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही आहे.काही काळापासून तो त्याच्या प्रवासात वेगळाच लढा देत होता दरम्यान तो आर्थिक अडचणींमुळे खूप त्रासला होता. यामागील मुख्य कारण म्हणजे त्याला चित्रपटात काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे पैसे कमवण्याचे कोणताही मार्ग त्याच्या समोर उभा नसल्याने त्याला कित्येकवेळा रिक्षात झोपावे लागत होते. कधी कधी मंदिरातही झोपताना तो आढळला होता. त्याची ही अवस्था त्याला शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवत होती. अनेक प्रयत्नांनीही त्याला काम मिळत नव्हते. अखेर हा लढा लढताना या अभिनेत्याला अपयश आले आणि तो त्याचा शेवट झाला.


हे वाचा- धर्मेंद्र यांच्या स्टाफमधील कर्मचारी कोरोना पोझिटीव्ह