घरमनोरंजनसलमान खानचा 'बॉडी डबल' म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्याचं निधन

सलमान खानचा ‘बॉडी डबल’ म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्याचं निधन

Subscribe

सागर पांडे याने अभिनेता सलमान खान याचा जवळपास 50 चित्रपटांमध्ये 'बॉडी डबल' म्हणून काम केले आहे आणि हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुद्धा सुपरहिट ठरले.

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान याचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट होतात. सलमान खानचे चित्रपट सुपर हिट होण्यासाठी पडद्यापुढील आणि पडद्यामागीलही अनेकांची मेहनत असते. बॉलिवूड मधील आणखी एका कारकाराने धक्कदायक रित्या जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेता सलमान याचा ‘बॉडी डबल’ म्हणून काम केलेला अभिनेता सागर पांडे याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना सागर पांडे यांचा मृत्यू झाला.

30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करत असतानाच सागरला हृदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यांनतर जिम ट्रेनरने सागरला तात्काळ रुग्णालयात सुद्धा नेले. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच सागरचा मृत्यू झाला होता. सागर पांडे 50 वर्षांचे होते आणि विशेष म्हणेज सागर पांडे सुद्दा सलमान प्रमाणे बॅचलर होते.

- Advertisement -

दरम्यान सागर पांडे याने अभिनेता सलमान खान याचा जवळपास 50 चित्रपटांमध्ये ‘बॉडी डबल’ म्हणून काम केले आहे आणि हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुद्धा सुपरहिट ठरले. दबंग, दबंग 2, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो आणि ट्यूबलाईट या चित्रपटांसोबत लोकप्रिय टी. व्ही शो बिग बॉस या कार्यक्रमात सुद्दा सागर पांडे याने सलमान खानचा ‘बॉडी डबल’ म्हणून काम केले आहे.

सागर पांडे उत्तर प्रदेश मधून मुंबईत बॉलिवूड मध्ये स्वतःचे नशीब आजमविण्यासाठी आला होता. पण तो अभिनेत्या ऐवजी ‘बॉडी डबल’ म्हणून काम करू लागले. सागर पांडे देश – विदेशात स्टेज शो सुद्धा करायचे. कोरोना काळात सागर पांडे आर्थिक अडचणीत असताना सलमान खानने त्याला मदतीचा हात दिला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – कंगना घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट; राजकारणात प्रवेश करणार का?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -