‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत मलखान सिंह भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू

अभिनेता दीपेश भानचा शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडला, त्यानंतर त्याला लगेच हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ मधील एका अभिनेत्याचं निधन झालेलं आहे. या मालिकेतील मलखान सिंह ही भूमिका साकारणार अभिनेता दीपेश भान यांनी आज जगाचा निरोप घेतलेला आहे. ‘भाभीजी घर पर है’मधील मलखान सिंह ही भूमिका साकारून दीपेश भानने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, त्याच्या मृत्यूची बातमी कळताच दीपेशच्या चाहत्यांसह संपूर्ण हिंदी टेलिव्हिजनर शोककळा पसरलेली आहे.

क्रिकेट खेळताना झाला अचानक मृत्यू
अभिनेता दीपेश भानचा शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडले, त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वयाच्या ४१ व्या वर्षी दीपेश भान यांनी जगाचा निरोप घेतला.

‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

दीपेश भान यांना हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांनी ‘भूतवाला सीरियल’, ‘एफआयआर’, ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘चॅम्प’ आणि ‘सुन यार चिल मार’ अश्या अनेक विनोदी मालिकांमध्ये काम केलेले आहे. याशिवाय ते ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील दिसले होते.


हेही वाचा :अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाचा ७ ऑक्टोबरला ‘गुडबाय’