‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘हा’ अभिनेता करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

'इंडियन पोलीस फोर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. आदिश वैद्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे

मराठी टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या पहिल्या सीजनमधून अभिनेता आदिश वैद्यने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी आदिश वैद्य ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये आदिश वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सहभागी झाला असला तरी, केवळ दोन आठवड्यात प्रेक्षकांचे मन जिंकले होते. दरम्यान आता आदिश लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. आदिशने याबाबतची एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे.

या शेअर केलेल्या सेटवरील फोटोमध्ये ‘इंडियन पोलीस फोर्स’ असं नाव दिसत आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. आदिश वैद्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्याला अनेक शुभेच्छा देत आहेत.

बिग बॉस मराठीमुळे आदिशला नवी ओळख मिळाली. त्याआधी आदिशने ‘रात्रीस खेळ चाले’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘तुमचं आमचं सेम असतं’. ‘गुम है किसी के प्यार में’ यांसारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पुलिस फोर्स’ ही पोलिसांवर आधारित वेब सीरीज असणार आहे. या सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी झळकणार, विवेक ओबेरॉय सुद्धा दिसून येणार आहे. ही ८ भागांची सीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :http://काय? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेन परत येणार…सुंदरलालने केला खुलासा