बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्या गुडबाय या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. या चित्रपटा दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंडना अमिताभ सोबत पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली होती. याविषयीची एक पोस्ट रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. आता या चित्रपटात अजून एका नवीन कलाकाराचे आगमन झाले आहे. हा अभिनेता गुडबाय मध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका पार पाडणार आहे. अभिनेता पवैल गुलाटी असे या अभिनेत्याचे नाव आहे. पवैल याने यापूर्वी थप्पड या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांसमोर सोडली होती. मात्र आता तो या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पवैल याने त्याच्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती प्रेक्षकांना दिली होती. यापोस्टमध्ये त्याने गुडबाय चित्रपट आपल्यासाठी खास असे म्हणले आहे. सोबतच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारासोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणं ही खूप खास संधी असल्याचे त्याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
पवैलने यापूर्वीही अमिताभसोबत काम केले होते. २०१४ साली युध या टीव्ही शोमध्ये ते एकत्र दिसले होते. गुडबाय या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा एका अंत्ययात्रेच्या भोवती फिरते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंडना, पवैल गुलाटी यांच्यासोबत नीना गुप्ताही दिसणार आहे. नीना गुप्ता अमिताभच्या पत्नीची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं असल्याचे नीना यांनी सांगितले होते.
हे वाचा – नेहा कक्करचा आवाज एकून अनु मलिकने स्वत:च्याच कानाखाली वाजवली