Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'हा' अभिनेता पार पाडणार 'सत्यशोधक' मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका

‘हा’ अभिनेता पार पाडणार ‘सत्यशोधक’ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका

लेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Story

- Advertisement -

लेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्यशोधक असे या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शोषित पिडीतांसाठी जोतिरावांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. अंधश्रद्धेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम ज्योतीरावांनी केले. शोषण कर्त्यांच्या विरोधात बंड पुकारत आपल्या लेखणीच्या माध्यमातून नवीन विचार रोवण्याचा प्रयत्न केला. रुढी परंपराच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखविला. या अशाच अनिष्ठ प्रथांच्या विरोधात समानतेच्या वाटेवर चालणाऱ्या सत्यशोधक समाज नावाच्या संस्थेची स्थापना केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalakruti Media (@kalakrutimedia)

 अशा क्रांतिकारी महात्मा फुलेंची जीवनयात्रा सत्यशोधक मध्ये पाहायला मिळेल. मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी दोनही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मागील ३ वर्षापासून या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे. या चित्रपटामध्ये जोतीरावांच्या भूमिकेत संदीप कुळकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्री माईची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून उर्वरित चित्रीकरण लवकरच पूर्ण होईल.


- Advertisement -

हे वाचा- दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर. संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिक ‘मेजर’ चित्रपटाचा टीजर झाला प्रकाशित

- Advertisement -