कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’मध्ये हा अभिनेता साकारणार संजय गांधींची भूमिका

या चित्रपटामध्ये कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील हळूहळू एकएक पात्र साकारणाऱ्या कलाकारांचा फर्स्ट लूक समोर येत आहे.

बॉलिवूडची धाकड गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रनौत वारंवार तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. येत्या काळात कंगनाचा ‘इमरर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील हळूहळू एकएक पात्र साकारणाऱ्या कलाकारांचा फर्स्ट लूक समोर येत आहे. नुकताच या चित्रपटामध्ये संजय गांधी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने शेअर केला फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं की, “टॅलेंटचे पावरहाऊस विशाक नायर संजय गांधीच्या रूपात”

कंगनाच्या ‘इमरर्जन्सी’ चित्रपटामध्ये संजय गांधीची भूमिका अभिनेता विशाक नायर साकारणार आहे. संजय गांधीच्या भूमिकेमध्ये विशाक नायरला पाहून प्रेक्षक कौतुक करू लागले आहेत. सोशल मीडियावर नेटकरी चित्रपटात निवडल्या गेलेल्या कास्टिंगचं कौतुक करू लागले आहेत. विशाक नायर व्यतिरिक्त याआधी या चित्रपटातून, कंगना रनौत, अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांचा लूक शेअर करण्यात आला आहे.

विशाक नायरने देखील मानले आभार
विशाक नायरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘इमरर्जन्सी’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, संजय गांधीची भूमिका साकारण्याची मला संधी दिल्या बद्दल खूप धन्यवाद. कंगना रनौत यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘इमरर्जन्सी’चा भाग बनून मी खूप खूश आहे.

कंगनाला संजय गांधीची भूमिका साकारणारा अभिनेता शोधण्यासाठी जवळपास 6 महिने लागले होते. ‘इमरर्जन्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती कंगना रनौत स्वतः करत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे.


हेही वाचा :

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये महिमा चौधरीची एन्ट्री; साकारणार ही महत्त्वाची भूमिका