Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'गदर 2' मध्ये सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री

‘गदर 2’ मध्ये सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

Subscribe

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

खंर तर, सिमरत कौर ही एक पंजाबी अभिनेत्री असून तिने अनेक पंजाबी म्यूजिक अल्बममध्ये काम केले आहे. सिमरत सुपरहिट पंजाबी बुर्ज खलीफा गाण्यामध्ये देखील दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Simrat Kaur (@simratkaur_16)

- Advertisement -

सिमरतने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपटातून केली होती. तसेच आता ‘गदर 2’ मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सिमरत देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

चित्रपटात सिमरत कौरचे पात्र महत्त्वाचे

‘गदर 2’ मधील तिची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची आहे. या चित्रपटात सनी देओल आपल्या मुलाची प्रेमिका म्हणजेच सूनेला आणण्यासाठी पाकिस्तानात जातो आणि तेथे गदर करतो. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सिमरत कौरभोवती फिरणार असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

भारतीय वधूप्रमाणे नटलेल्या पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्रोल होताच नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

- Advertisment -