Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालिकेतील याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. सिद्धार्थ आणि अदिती सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती हि प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतेय.

Related Story

- Advertisement -

झी मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे राणा दा. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

मालिकेतील याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. सिद्धार्थ आणि अदिती सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती हि प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतेय.
प्रेक्षकांचा मालिकेला मिळणार उत्फुर्त प्रतिसाद बघून अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. त्यांची उस्फुर्त प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पावती आहे. या मालिकेसारखं वातावरण खूप कमी बघायला मिळतं. अदितीला माणसांबद्दल भीती असणं हा गुण वास्तवातही कुठे ना कुठे पहायला मिळतो. माणसं आपल्या आपल्यातच इतकी रमतात की, छोट्या कुटुंबातही त्यांचं एकमेकांकडं लक्ष नसतं. एकमेकांशी कम्युनिकेशनच नसतं. मोठ्या कुटुंबात न राहून आपण नक्की काय मिस करतोय हे आजच्या जनरेशनला या मालिकेच्या माध्यमातून समजतंय. मोबाईल आणि कॅाम्प्युटरच्या पलिकडे जाऊन माणसांचंही एक जग असतं हे युथला समजतंय. त्यात काय सुख असतं हे प्रेक्षकांना जाणवतंय.”


हे हि वाचा – BB OTT: शमिता-राकेशची जोडी सुनंदा शेट्टीला आली पसंत स्पर्धक म्हणाले, सासूबाई तयार आहेत…

- Advertisement -