घरमनोरंजनबिग बॉस १६ ची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या हाती, पुण्याचा रॅपर ठरला विजयी

बिग बॉस १६ ची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या हाती, पुण्याचा रॅपर ठरला विजयी

Subscribe

मुंबई – बिग बॉस ग्रॅण्ड फिनालेमध्ये एमसी स्टॅन विजयी ठरला आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या एसमी स्टॅनच्या नावाची घोषणा होताच एकच जल्लोष झाला होता. अटीतटीच्या ठरलेल्या स्पर्धेत एससी स्टॅनने बाजी मारल्याने त्याचे चाहते भलतेच खूष झाले आहेत.

प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालीन भनोट, एमसी स्टॅन, अर्चना गौतम हे स्पर्धक टॉप फाईव्हमध्ये पोहोचले होते. परंतु, खरी लढत शालीन भनोट, अर्चना आणि एमसी स्टॅन या तिघांमध्ये झाली. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

- Advertisement -

23 वर्षीय एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो मुळचा पुण्याचा आहे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. यामुळेच वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्याने कव्वाली ऐकायला सुरुवात केली. यानंतर अल्ताफचे मन रॅपकडे अधिक आकर्षित होऊ लागले आणि मग हळूहळू तो रॅप करू लागला. आज स्टॅन एक रॅपर तसेच गीतकार आणि संगीतकार आहे. त्याची फॅन फॉलोइंगही करोडोंच्या घरात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


19 आठवडे बिग बॉसच्या घरात राहताना एमसी स्टॅन मस्तीखोर, मजामस्ती करणारा आणि दिलखुलास दिसला. त्याने अनेक टास्कही व्यवस्थित पूर्ण केले. बिग बॉस १६ चे पर्व जिंकल्याने त्याला ३१ लाख ८० हजार रोख रक्कम आणि नवी कोरी कार भेट म्हणून देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -