घरमनोरंजनअभिनेते परीक्षित सहानींच्या जीवनावर ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तक लवकरच होणार प्रकाशित

अभिनेते परीक्षित सहानींच्या जीवनावर ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तक लवकरच होणार प्रकाशित

Subscribe

हे पुस्तक 28 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि दीप्ती नवल यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते परिक्षित सहनी यांच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’(Strange Encounters) या नवीन पुस्तकाच्या आगामी प्रकाशनाचीघोषणा सायमन अँड शूस्टर इंडियातर्फे करण्यात आली आहे. हे पुस्तक 28 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रख्यात अभिनेते अनुपम खेर(anupam kher) व दीप्ती नवल(dipti naval) यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.“हे पुस्तक म्हणजे लेख, आठवणी आणि वृत्तांतांचे मिश्रण आहे. मी आयुष्यभर केलेल्या प्रवासांदरम्यान माझ्या मनावर ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा यात समावेश आहे.आठवणींना उजाळा देत असताना प्रकर्षाने आठवेले प्रसंग मी लिहून काढले आहेत. रशिया तघेतलेले चित्रपटाचे प्रशिक्षण, बॉलिवूडमधील दिवस व सेलेब्रिटी म्हणून आलेले अनुभव यांच्या आठवणी यात उलगडण्यात आल्या आहेत” असे अभिनेते व पुस्तकाचे लेखक परिक्षित साहनी म्हणाले.

परिक्षित साहनी हे भारतीय अभिनेते आहेत आणि ते गुल गुलशन गुलफाम (दूरदर्शन), गाथा (स्टारप्लस) आणि बॅरिस्टर विनोद या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स व पीके आदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ते प्रख्यात अभिनेते बलराज साहनी यांचे पुत्र आहेत, तसेच प्रसिद्ध लेखक भीष्म साहनी यांचे पुतणे आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागचं कारण आलं समोर

- Advertisement -

“हा संग्रह म्हणजे प्रख्यात अभिनेते परिक्षित साहनी यांच्या थेट हृदयातून आलेल्या आठवणी आहेत.यातील प्रत्येक प्रकरण हे एका विशिष्ट घटनेबद्दल सांगणारे असले, तरी त्यांच्या आयुष्याचा प्रवासयात परिपूर्णतेने सामावला आहे. हे पुस्तक खूपच प्रामाणिकपणे तरीही सध्या दुर्मीळ होत चाललेल्या हृदयस्पर्शी अशा हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेले आहे. परिपूर्णतेने जगलेल्या एका आयुष्याची ही कथा आहे. हे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला वाचक विविध काल्पनिक व्यक्तिरेखांच्या स्वरूपात पडद्यावर अनेकदा भेटलेले आहेत, आता या व्यक्तिरेखांमागील खऱ्या व्यक्तीला भेटण्याची संधी त्यांना मिळणार आहे,” असे सायमन अँड शूस्टर इंडियाचे वरिष्ठ कमिशनिंग संपादक संयतन घोष म्हणाले.

हे ही वाचा – गायक दिव्या कुमारचं मराठी म्युझिक अल्बममध्ये पदार्पण!!

साहनी कुटुंबाला अत्यंत आवडणाऱ्या विद्वत्तापूर्ण कथनशैलीत स्ट्रेंज एन्काउंटर्स हे पुस्तक लिहिले गेले आहे आणि वाचकाला आपलेसे करून घेणारी शैलीही अवलंबण्यात आली आहे. स्मृतींचा हा लोलकाचा आकाराचा संग्रह आहे. हिंदू, ख्रिश्चन व इस्लामी तत्त्वज्ञानांतील चांगुलपणा यात एकत्र करण्यात आला आहे; सोव्हिएट रशियात चित्रपटाची कला शिकण्यापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्टॅनिस्लॅवस्कीचा त्याग करण्यापर्यंत, तसेच या संपूर्ण मार्गात शांतता व जागा शोधण्यापर्यंत, परिक्षित साहनी यांच्या संपूर्ण प्रवासाचे हे बहुसांस्कृतिक, बहुअंगीय कथन आहे.

हे ही वाचा – बिग बॉस फेम विशाल निकमचा नवा म्युझिक अल्बम ‘तू संग मेरे’ लवकरच भेटीला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -