घरमनोरंजनमुलगा दहा वर्षांपासून पोटभर जेवलाही नाही... झरीना वहाब

मुलगा दहा वर्षांपासून पोटभर जेवलाही नाही… झरीना वहाब

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. कोर्टाने बॉलिवूड अभिनेता आणि जिया खान प्रकरणातील आरोपी मानला जाणारा जियाचा प्रियकर सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. 10 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानंतर सूरज सध्या प्रचंड चर्चेत आहे. अशातच, आपल्या मुलाची निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरजची आई झरीनाने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सूरजची आई झरीना म्हणाली की, “आता आम्ही पुन्हा सामान्य कुटुंबासारखे आहोत. गेली दहा वर्षे आम्ही खूप अस्वस्थ होतो आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल हे माहीत होते. आम्हाला न्याय मिळाला पण त्या मातांचे काय? ज्यांची मुलं आजही तुटलेल्या नात्यांमुळे तुरुंगात आहेत. त्यांच्यासाठी मला वाईट वाटते.”

- Advertisement -

बेटे के साथ जरीना वहाब, जिन्होंने कई हिंदी और मलयाली फिल्मों में काम किया है।

पुढे झरीना म्हणाली की, “मला ज्या प्रकारचा त्रास सहन करावा लागला तसा त्रास इतर कोणत्याही आईला होऊ नये. मुलगा खोट्या खटल्याला सामोरे जात असताना कोणतेही कुटुंब सामान्य जीवन जगू शकत नाही. माझ्या मुलाने काय चूक केली? ज्याचा त्रास त्यांना 10 वर्षे सहन करावा लागला. आता आम्हाला शांतता हवी आहे आणि 10 वर्षांनंतर सामान्य जीवन जगायचे आहे.” असं झरीना पांचोली म्हणाली.

- Advertisement -

निकालानंतर सूरजची प्रतिक्रिया

शुक्रवारी निर्दोष सुटल्यानंतर पत्रकारांना सूरजने पहिली प्रतिक्रिया दिली यावेळी तो म्हणाला की, “या निकालाचे 10 वर्ष माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. पण आज मी केवळ माझ्याविरुद्धचा हा खटला जिंकला नाही तर माझा सन्मान आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे, अशा घृणास्पद आरोपांसह जगाला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य हवे होते. मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की एवढ्या लहान वयात मी ज्या गोष्टीतून गेलो ते कोणीही करू नये, मला माहित नाही की माझ्या आयुष्यातील ही 10 वर्षे मला कोण परत देईल, परंतु मला आनंद आहे की हे शेवटी मला यश मिळाले फक्त माझ्यासाठीच नाही तर खास माझ्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे.” असं सूरज म्हणाला.

 


हेही वाचा :

‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ ही अनोखी शॉर्टफिल्म १२ मे ला प्रदर्शित होणार!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -