The Broken News : सोनाली बेंद्रेच्या डिजिटल डेब्यूचा फर्स्ट लूक रिलीज; दिसणार ‘या’ भूमिकेत

the broken news actress sonali bendre shares her first look from the Digital film
The Broken News : सोनाली बेंद्रेच्या डिजिटल डेब्यूचा फर्स्ट लूक रिलीज; दिसणार 'या' भूमिकेत

बॉलिबूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिती गणना 90 च्या दशकातील सर्वात टॉपची अभिनेत्रींमध्ये केली जाते. आजही तिचा मोठा फॅनबेस आहे. त्याकाळी चित्रपटांसाठी अभिनेत्री म्हणून सोनालीला प्रेक्षकांची पहिली पसंती असायची. प्रेक्षक तिच्या सौंदर्याचे वेड असायचे. यात मोठ्या ब्रेकनंतर सोनाली डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळली आहे.अभिनेत्री लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या चित्रपटातून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर ती पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्रीने या मालिकेतील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे सोनाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

करताना सोनालीने लिहिले की, “आज मी तुमची अमिना कुरेशी यांच्याशी तुमची ओळख करून द्यायची आहे. ज्या भारतीच्या मुख्य संपादक आहेत. तिच्यासाठी काल्पनिक गोष्टींपेक्षा जास्त तथ्ये महत्त्वाचे नाहीत. यामागे किती पैसा आहे. पहा सनसनाटी आणि सत्य यांच्यातील ही लढाई… लवकरच ZEE5

या सिरीजमध्ये सोनाली बेंद्रे पत्रकाराची भूमिका साकारत आहे. त्यामुळे सोनालीच्या पत्रकाराच्या भूमिकेतील अभिनय पाहण्यासाठी चाहते फारचं उत्सुक आहेत. ती तिच्या डिजिटल डेब्यू सिरिजचे जोरदार प्रमोशन देखील करत आहे. याचे दिग्दर्शन विनय वैकुल करत आहे, ज्याने अलीकडेच नेटफ्लिक्स ‘आरण्यक’ या क्राईम थ्रिलरचे दिग्दर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

ही सिरीज मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी वृत्तवाहिन्यांवर आधारित आहे. एक चॅनल ‘आवाज भारती’ आहे, जे एक स्वतंत्र, नैतिक वृत्तवाहिनी आहे आणि दुसरे ‘जोश 24/7’ हे सनसनाटी आणि आक्रमक पत्रकारितेसाठी ओळखले जाते. ही आगामी सिरीज Zee5 वर केव्हा प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. यामध्ये सोनालीसोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना, किरण कुमार यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत.


राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या ‘Anand’ चित्रपटाचा Remake; लवकरच स्टारकास्टवरून पडदा पडणार