घरमनोरंजनमनोरंजन क्षेत्राच्या शंका निरसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मनोरंजन क्षेत्राच्या शंका निरसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Subscribe

चित्रिकरण करता येईल असं नमूद केल्यामुळे मग बबल करावा की नाही असे काही संभ्रम निर्माण झाले आहेत. या कालावधीत आणखी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून. सरकारने काही नियमांअतर्गत अनलॉकिंगचे वेगवेगळे टप्पे तयार केले आहे. तसेच यामध्ये पाच टप्पे तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या अनलॉकच्या प्रक्रिये दरम्यान चित्रपट मनोरंजन क्षेत्रासाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे, या तिसर्‍या टप्प्यात येणार्‍या ठाणे, मुंबई आणि नाशिक या भागात चित्रिकरण सुरू करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान चित्रपट सृष्टीशी निगडीत अनेकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या क्षेत्रातल्या मान्यवरांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, निर्माते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या नियोजनाने या  बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे , त्यात चित्रिकरणाबद्दल सूचित करताना पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली आहे. पण  तिसऱ्या टप्प्यात परवानगी देताना त्यामध्ये  बबल असं लिहून  पुढे स्वल्पविराम देण्यात आला आहे तसेच पुढे लिहले आहे की, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाह्य चित्रिकरण करण्याची परवानगीही दिली आहे. यामुळे अनेक चित्रपट कर्मचार्‍यांच्या मनात प्रश्न तसेच अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत . जर बायो  बबल करायचा असेल तर मग पाचवाजे  पर्यंत चित्रिकरण करण्याची अट का? कारण जर  बायोबबलमध्ये एकदा चित्रिकरण सुरूवात  केल्यानंतर आपण कितीही वेळ चित्रिकरण करू शकतो. कारण, या बबलमध्ये कुणी बाहेरचं आत येत नाही आणि आतले कोणी बाहेर जात नाही. शिवाय, पाच वाजेपर्यंत बाहेरील चित्रिकरण करता येईल असं नमूद केल्यामुळे मग बबल करावा की नाही असे काही संभ्रम निर्माण झाले आहेत. या कालावधीत आणखी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

- Advertisement -
बैठकी दरम्यान काय बोलण्यात आले-

ज्या शहरात, गावांत, जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हीटीचा दर हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे आणि रुग्णालयात ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण ४० टक्क्यांहून अधिक आहे, ते सर्वजण तिसऱ्या स्तरात येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाचे चित्रीकरण होऊ शकते. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे.आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आजच्या झालेल्या बैठकीत  टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के.माधवन, मेघराज राजेभोसले,आदेश बांदेकर, प्रशांत दामले,भरत जाधव,सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, झी समूहाचे पूनित गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर,सतीश राजवाडे, नीलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी, त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आदी सहभागी झाले होते.

- Advertisement -

हे हि वाचा – शरद पवारांनी हिंदुजा रुग्णालयात घेतली दिलीप कुमार यांची भेट, तब्येतीची विचारपुस

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -