Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रोहित शेट्टीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यानी केले स्वागत

रोहित शेट्टीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यानी केले स्वागत

रोहित शेट्टी यांनी घेतलेल्या कठीन निर्णयाचे स्वागत केले. रोहित शेट्टी याचा बहुचर्चित आगामी चित्रपट "सुर्यवंशी" याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली असल्याचे जाहिर केले

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये शासनातर्फे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येचा आकडा हजारोंच्या घरात पोहचत आहे. शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॅाकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन सिनेमागृहांना देखील बंद ठेवण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत. चित्रपटांच्या तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. कोणताही कडक निर्बंध लागु करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोरंजन क्षेत्राशी संबधित व्यक्तींशी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिग्दर्शक निर्माता रोहित शेट्टी,कमल गायचंदानी,सीईओ,पीवीआर पिक्चर,कपिल अग्रवाल,जॅाइंट मॅनेजिंग डायरेक्टर,युएफओ मुविज,अक्षये राठी,फील्म एक्जीबीटर आणि डिस्ट्रीब्युटर,आलोक टंडन चित्रपटसृष्टीतील निगडित काही लोक सहभागी झाले होते.
या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक निर्माता रोहित शेट्टी यांनी घेतलेल्या कठीन निर्णयाचे स्वागत केले. रोहित शेट्टी याचा बहुचर्चित आगामी चित्रपट “सुर्यवंशी” याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली असल्याचे जाहिर केले आहे. काही दिवसांपुर्वी ३० एप्रिल रोजी चित्रपट रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुन्हा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या या निर्णयाचे मुख्यमंत्र्यानी स्वागत केलं. तसेच चित्रपटसृष्टीतील संबंधित अडचणीबाबत काही प्रश्न मांडण्यात आले आसता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले सिनेमाजगतात कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण ‘जान हे तो जहान है’ म्हणजेच सध्या च्या घडीला सरकारची प्राथमिकता लोकांचे आरोग्य स्वास्थ राखणे, तसेच कोरोना व्हायरसच्या प्रसारास आळा घालणे हे आहे. भविष्यात लोकांना नोकऱ्या मिळतील पण सर्वात आधी या प्राणघातक व्हायरस पासून बचाव करणे गरजेचे आहे. अशी चर्चा बैठकीदरम्यान करण्यात आली.


हे हि वाचा – ‘द इंटर्न’ सिनेमात दीपिकासह पुन्हा दिसणार बिग बी

- Advertisement -