‘Kabhi Eid Kabhi Diwali’ चित्रपटामध्ये ‘या’ साउथ सुपरस्टारची एन्ट्री

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या बहुचर्चित चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नवनवीन अपडेट समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील काही अभिनेते चित्रपटातून बाहेर पडले होते. मात्र आता सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये एका टॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

सलमान खानच्या चित्रपटात टॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री
सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये आता टॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता जगपति बाबूची एन्ट्री झाली असून जगपति बाबू या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगपति बाबू शिवाय या चित्रपटात टॉलिवूडच्या दोन कलाकारांचा सहभाग आहे, यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेता व्यंकटेश हे दोघे असून चित्रपटात यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. सूत्रांच्या मते सलमान खान चित्रपटाच्या कास्टींगकडे पुरेपुर लक्ष देत आहे.

खरंतर जगपति बाबूला सलमान दबंग ३ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची इच्छा होती मात्र त्यावेळी काही अडचणींमुळे चित्रपटात त्यांचा सहभाग होऊ शकला नाही, मात्र यावेळी सलमान खानने जेव्हा ‘कभी ईद कभी दिवाली’साठी जगपति बाबूंना विचारले तेव्हा ते लगेच हो म्हणाले. ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाला एका तगड्या खलनायकाचा शोध होत, जो चित्रपटात सलमान आणि व्यंकटेशला तगडी फाइट देऊ शकेल. इतकचं नव्हे तर या चित्रपटात अभिनेत्री शहनाज गिल सुद्धा दिसून येणार आहे. या चित्रपट ३० डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :नवी मुंबईमध्ये पार पडला ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा