‘चतुर चोर’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

लवकरच एक नवा कोरा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण लंडन येथे झाले आहे.

हॉरर कॉमेडीला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही कॉमेडीची जागा अद्याप कोणीही घेतली नाही तसेच काहीसे चित्रपटांच्या बाबतीतही आहे. हॉरर कॉमेडी म्हटलं की हॉरर आणि कॉमेडी दोन्हीकढील प्रेक्षक वर्ग हा एक होऊन चित्रपटास योग्य तो न्याय देतो. लवकरच एक नवा कोरा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण लंडन येथे झाले आहे. तगड्या स्टारकास्टचा हा सिनेमा असून या सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री प्रीतम कागणे, अक्षया देवधर हे कलाकार झळकणार आहेत.

हार्दिक, प्रीतम आणि अक्षयाने या सिनेमात काय हॉरर कॉमेडी केलीय हे पाहणं विशेष रंजक ठरणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलवली असून सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे. तर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अमोल गोळे यांनी या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे.

चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडी ‘चतुर चोर’ मधला चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

 


हेही वाचा :काश्मिरी पंडिताच्या मृत्यूवर अनुपम खेर यांनी व्यक्त केला तीव्र संताप