घर मनोरंजन 'RRR' चित्रपटाला मिळालं गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समधील नॉमिनेशन

‘RRR’ चित्रपटाला मिळालं गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समधील नॉमिनेशन

Subscribe

साऊथचा सुपरस्टार राम चरणच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने फक्त भारतातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांचे मन जिंकले. नुकताच या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नॅमिनेशन मिळालं आहे. ज्यामुळे हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडिया नेटकऱ्यांसह मोठमोठे दिग्गज कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करु लागले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कलाकार आनंद व्यक्त करु लागले आहेत.

प्रभास आणि आलियाने व्यक्त केला आनंद
अभिनेता अजय देवगण,आलिया भट्ट, राम चरण आणि ज्यूनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींची कमाई करण्यात आली. भारतातच नाही तर या चित्रपटाने परदेशातही प्रसिद्धी मिळवली. दरम्यान, आता या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समधील दोन कॅटेगरीमध्ये नॅमिनेशन मिळालं आहे. ज्यानंतर बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

- Advertisement -

- Advertisement -

प्रभासने आणि आलियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला असून गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नॅमिनेशन मिळाल्याबद्दल अभिमानास्पद वाटत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा, करण जौहर, ए आर रहमान यांनी देखील सोशल मीडियावरुन आनंद व्यक्त केला आहे.

‘या’ दिवशी चित्रपट झाला होता प्रदर्शित
दिग्दर्शक एस एस राजामौलींचा ‘आरआरआर’ 24 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. राम चरणच्या या चित्रपटाने पहिल्यापासून बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये अभिनेता अजय देवगण,आलिया भट्ट, राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते.

 


हेही वाचा :

RSS वर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीमुळे जावेद अख्तर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -