‘ऊंचाई’ चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात कमावले इतके कोटी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, बोमन ईरानी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अभिनेत्री नीना गुप्ता देखील या चित्रपटात महत्वाची साकारताना दिसतील. 11 नोव्हेंबर रोजी हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे दोन दिवस झाले. परंतु दोनच दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे.

‘ऊंचाई’ चित्रपटाने कमावले 2 दिवसात इतके कोटी
अमिताभ बच्चन आणि परिणीती चोप्राच्या ‘ऊंचाई’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोनच दिवसात बऱ्यापैकी कमाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांचा हा चित्रपटला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 1.81 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 2 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. तसेच एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 3 कोटींचा टप्पा 2 दिवसात पार केला आहे. या चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात झाली नसली तरी या चित्रपटाचे निर्माते चित्रपट पाहून खूश झाले.

परिणीती चोप्राने साकारणारली गाईडची भूमिका
अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा गाईडची भूमिका साकारताना दिसून येईल. चित्रपटामध्ये परिणीती ट्रेकिंग गाईड आहे. जी लोकांना ट्रेकिंगमध्ये येणाऱ्या संकटांबद्दल सांगते. या चित्रपटामध्ये परिणीती अमिताभ बच्चन यांच्या मित्रांना माउंट एवरेस्टवर चढण्यासाठी मदत करते.

 


हेही वाचा :

वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटातील ‘जंगल में कांड’ गाणं प्रदर्शित